Last Updated: Thursday, November 7, 2013, 15:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईविरारमध्ये आसाराम बापूंचा आश्रम तोडण्यास सुरुवात करण्यात आलीय.. तहसीलदारांनी आश्रम अनधिकृत असल्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत. कुंभारपाडामध्ये हा आश्रम आहे.
स्वयंघोषित संत आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्या विरारमधील आश्रमावर कारवाई करण्यात आली आहे. कुंभारपाडा भागातील आसाराम बापू यांचा सर्वे नंबर ४०१ मधील गुरुचरण शासकीय जागेवर अवैध्य आश्रम बांधण्यात आला आहे. या आश्रमावर आज सकाळी वसई विरार महानगरपालिका व तहसील कार्यालयाने तोडक कारवाई करण्यात आली.
आज सकाळी आश्रमावर ही कारवाई केली. हा अतिशय आलिशान आश्रम होता. या आश्रमात नारायण साई आपल्या लीला दाखवत असत. काही दिवसांपूर्वीच विरार पोलिसांनी या आश्रमावर छापा टाकला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, November 7, 2013, 14:44