आव्हाडांच्या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर परिणाम नाही, Awhad`s hunger strike seem doesn`t matter for CM

आव्हाडांच्या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर परिणाम नाही

आव्हाडांच्या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर परिणाम नाही
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ठाण्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी उपोषण केलं असलं तरी या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

एका महिन्यात क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी काल उपोषण मागे घेतलं होतं. या आश्वासनाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी ठोस उत्तर देणं टाळलं. त्याचप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत आपण पावसाळी अधिवेशनात भूमिका मांडली आहे. आता वेगळं सांगण्याची गरज नाही, असं उत्तर त्यांनी दिलंय. यावरून जितेंद्र आव्हाडांना आपण आश्वासन दिलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलंय.

ठाण्यातील जुन्या इमारतींच्या क्लस्टर डेव्हलपमेंटवरुन राजकीय वातवारणात तापलं आहे. यासंदर्भात श्रेयाची लढाई सुरू असतानाचा याचं श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये याची मुख्यमंत्र्यांनी पुरेपुर काळजी घेतली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 22:06


comments powered by Disqus