Last Updated: Tuesday, June 10, 2014, 21:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबूंच्या गराड्यात असतात, त्यामुळेच कामं होत नसल्याचा घरचा आहेर काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकींनी दिला आहे.
अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करुन स्वत:चा फायदा करुन घेतात, त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना बाजूला सारुन इतिहासात नोंद होईल, असा एक तरी निर्णय घ्यावा, असं बाबा असं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलंय.
काँग्रेसमधील नारायण राणे, पतंगराव कदम यासारखे दिग्गज नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध करून थकल्यानंतर, काँग्रेस आमदार बाबा सिद्धीकी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात तोफ डागली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 21:33