बाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना, Bal Thackeray, the MNS prayer

बाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना

बाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना
www.24taas.com, मुंबई

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही राजकीय पक्ष वेगळे असले तरी दिल्याने एक असल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कोणताही कठिण प्रसंग आला की मदतीला धाऊन जाण्याची संस्कृती आपली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या राज्यातील राजकारणात दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेच्यावेळी राज ठाकरे सर्व विसरून मातोश्रीवर गेले. आता तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंदिरात जाऊन प्रार्थना केलली.

बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवसैनिक असलेल्या जुन्या सहका-यांना घेऊन राज्यातील काही देवस्थानांना भेटी दिल्या. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.

बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत आहे. मागील आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन वेळा मातोश्रीवर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बाळासाहेब लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा राज्यातील सर्वच शिवसेना नेते आणि अन्य राजकीय पक्षाचे नेतेही व्यक्त करीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन खुशाली विचारली. आमदार बाळा नांदगावकर यांनी ५० कार्यकर्त्यांसह एका बसद्वारे पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट येथे जाऊन शिवसेनाप्रमुखांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी साकडे घातले.

First Published: Thursday, November 8, 2012, 11:59


comments powered by Disqus