बाळासाहेबांवरील पुस्तक `युगान्त`आज होणार प्रकाशन, Balasaheb book `Yugant` written by Sanjay Raut

बाळासाहेबांवरील पुस्तक `युगान्त`आज होणार प्रकाशन

बाळासाहेबांवरील पुस्तक `युगान्त`आज होणार प्रकाशन
www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या `युगान्त` या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राऊत यांनी लिहिलेली लेखमाला `युगान्त` या पुस्तकरुपानं प्रकाशित होणार आहे.

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि रामायण-महाभारताचे अभ्यासक दाजी पणशीकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

मुंबईत शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

First Published: Friday, January 18, 2013, 12:59


comments powered by Disqus