Last Updated: Tuesday, September 11, 2012, 09:52
www.24taas.com, मुंबई मुंबईत मानखुर्दमधल्या नवजीवन महिला सुधार गृहातून तब्बल १७ महिला एकाच वेळी गायब झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून या महिला सुधारगृहातून अचानक नाहिशा झाल्या आहेत. रात्री १० ते पहाटे ५ वाजल्यादरम्यान या महिला गायब झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गायब झालेल्या महिल्यांमध्ये बहुतेक बारमध्ये काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी वेळोवेळी घातलेल्या छाप्यात पकडलेल्या बारगर्ल्सना सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं.
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला गायब कशा झाल्या, सुधार गृहातल्या कर्मचाऱ्यांनीच त्यांना मदत केली का? याचा पोलीस तपास घेत आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Tuesday, September 11, 2012, 09:52