Last Updated: Friday, February 14, 2014, 13:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफोनवरून प्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने भावाची हत्या केल्याची घटना मुंबईतील दादरमध्ये उघडकीस आली आहे. राग अनावर झाल्याने भावाला भावाने चाकूने भोसकले.
दादरमध्ये दोघे भाऊ आईस्क्रीम पार्लर चालवतात. मृत जीतूराजने भाऊ नवीनच्या प्रेयसीला शिव्या फोनवरून दिल्या होत्या. त्यामुळे राग अनावर झाल्याने आईसक्रीम कापण्याच्या चाकूने नवीन याने जीतूराज या भावाची हत्या केली. गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 12:47