Last Updated: Thursday, December 12, 2013, 19:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॅँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या तीन बहिणींच्या टोळीला मीरारोड पोलिसांनी अटक केलीय. गौरी श्रीकांत, मोना गुडा आणि जोगेश्वरी गुडा अशी या बहिणींची नावं आहेत.
मीरा रोडच्या ‘बॅँक ऑफ इंडिया’च्या सीसीटीव्हीत त्यांच्या या चोरीचा प्रताप कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं पोलिसांनी या तिघींना अटक केलीय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तिन्ही बहिणी चोरी करतानाची दृश्यं स्पष्ट दिसत आहेत. बॅँकेत पासबुक भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या एका ग्राहकाची प्लॅस्टिकची पिशवी कापून ५० हजार रुपये या तिघींनी सराईतपणे लंपास केले होते.
या टोळीनं मीरारोडच्या ‘बॅँक ऑफ बडोदा’मध्येही अशाच प्रकारे चोरी केली होती. मात्र, अखेर सीसीटीव्ही आणि एका महिलेच्या सतर्कतेमुळे ही टोळी जेरबंद झालीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 18:47