मुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग, Best Bus and Hotel Fire

मुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग

मुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग
www.24taas.comमुंबई

मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यात. घाटकोपर येथे बसला तर गोरेगावमध्ये एका हॉटेलला आग आगली. आगीत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

घाटकोपर पोलीस स्टेशनसमोर बेस्टच्या बसला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. ही बस सायनला येत होती. आग लागल्याचे लक्षात येताच बाका प्रसंग टळला. थोड्याच वेळात बसची आग विझवण्यात यश आले.

तर दुसऱ्या एका घटनेत गोरेगावमधल्या रॉयल पाम हॉटेलला आग लागलीय. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या रवाना झाल्या आहेत. दोन वर्षांपासून हे हॉटेल बंद होतं. त्या ठिकाणी नुतणीनकरणाचं काम सुरू होतं. हॉटेलचा सातव्या मजल्याला आग लागल्याचे सांगण्यात आले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत

First Published: Monday, January 7, 2013, 15:06


comments powered by Disqus