मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी

Last Updated: Friday, May 9, 2014, 18:55

मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी घेतली आहे. गुजरातमधील संदेश या वृत्तपत्राची वादग्रस्त जाहिरीती बेस्टवरून हटविण्याची मागणी मनसेनेने केली आहे. गुजरात विरोधात भूमिका सामनामधून मांडण्यात आली होती. त्यामुळे गुजरात वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 08:22

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.

बेस्ट चालक-वाहकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 08:35

बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.

मुंबईकरांनो `नायडू सिस्टर्स`पासून सावधान!

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:25

सासू, सून, नणंद, भावजय आणि भाची असं एक अख्खं कुटुंब आणि चोरटं... आठ महिलांच्या या टोळीनं मुंबईकरांना जोरदार हिसका दाखवलाय. तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर सावध रहा.

संतप्त प्रवाशांचा मुंबई बेस्टला दणका, बसच रोखली

Last Updated: Friday, November 1, 2013, 12:19

बेस्ट प्रशासनाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात आज सकाळी प्रवाशांनी आवाज उठवत महेश्वरी उद्यान स्थानकात बस रोखून धरल्या.

मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ

Last Updated: Friday, March 29, 2013, 10:40

मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे.

मुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग

Last Updated: Monday, January 7, 2013, 15:07

मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यात. घाटकोपर येथे बसला तर गोरेगावमध्ये एका हॉटेलला आग आगली. आगीत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

बेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 08:54

बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.

बेस्टचं दिवाळं... दिवाळीत कर्मचाऱ्यांचा पगार टांगणीला

Last Updated: Saturday, October 20, 2012, 08:48

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.

‘बेस्ट’च्या तिकीटांत पुन्हा होणार दरवाढ

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 08:34

महागाईनं सामान्यांना आणखी एक धक्का दिलाय. इंधन, गॅस, रिक्षा-टॅक्सी दरवाढीपाठोपाठ आता बेस्ट बसेसच्या तिकिटांच्या दरातही वाढ होणार आहे.

मुंबईची 'बेस्ट' तोट्यात

Last Updated: Thursday, August 9, 2012, 11:04

मुंबईची लाईफलाईन बेस्ट आता तोट्यात असल्याचं उघड झालंय. बेस्ट परिवहनाच्या 507 बसमार्गांपैकी एकही मार्ग नफ्यात नसल्याची धक्कादायक बाब बेस्टच्या वर्धापनदिनी समोर आलीय.

'बेस्ट' नाही 'बेस्ट', अखेर होणार भाडेवाढ ..

Last Updated: Monday, April 2, 2012, 17:49

मुंबईकरांचा बेस्टचा प्रवासही महागला आहे. बेस्टचे किमान भाडे आता पाच रुपये करण्यात आलं आहे. याआधी बेस्टचं किमान भाडे ४ रुपये होतं, त्यामुळे आता बेस्टची भाडेवाढ तब्बल १ रूपयाने वाढविण्यात आली आहे.

'बेस्टचा' आधार 'बेस्ट'

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:44

मुंबई पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले. या जम्बो ब्लॉकचा परिणाम बेस्ट वाहतुकीवरही झाला. लोकल बंद असल्याने मुंबईकरांनी दुसरी लाइफलाईन बेस्टचा आधार घेतला. मात्र वाहतुकीचा सारा ताण बेस्ट बसवर आल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला आज मिळाली.

बेस्टने घेतली प्रवाशांच्या मागणीची दखल

Last Updated: Monday, December 19, 2011, 17:50

बोरीवली पश्चिमेकडील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेत बेस्ट उपक्रमानं आपल्या 228 क्रमांकाच्या सेवामार्गात परीवर्तन केलं आहे. आता ही बेस्ट बस चारकोप, जयराज नगर, योगीनगर बोरीवली स्टेशन, भगवती रुग्णालय मार्गे रावळपाडा दहिसर पूर्व अशी धावणार आहे...