बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल? best of luck for hsc student

बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?

बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यभर 20 तारखेपासून 12 वीची परीक्षा सुरु होतेय. परीक्षेला यंदा 11`99`531 नियमीत विद्यार्थी तर 1`37`783 पुर्नपरिक्षार्थी बसणार आहेत.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी असं आवाहन सर्वच स्तरातून केलं जातंय.

सध्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या हेल्पलाइन नंबरवर शेकडो फोन येतायत.

परीक्षेची भीती वाटतेय, मला आठवेल का, माझा अभ्यास झाला नाही... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या मानसोपचार तज्ञांना द्यावी लागतायत.
 
परीक्षा काळात काय काळजी घ्याल ?
 
परीक्षेच्या काळात 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. त्याचबरोबर  
संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. 
 
चिडचिड करू नये, शांत राहण्याचा प्रयत्न करावा
दररोज 10 मिनिटं प्राणायाम करावा
विद्यार्थ्यांनी मन एकाग्र ठेवावं
प्रोत्साहन देणारे सुविचार आणि कविता वाचाव्यात
सकारात्मक विचार असलेल्या मित्रांशीच संवाद साधावा
पालकांनी पाल्याला रागवू नये
पालकांनी अभ्यासासाठी पाल्यावर दबाव आणू नये
पालकांनी इतर मुलांशी आपल्या पाल्याची तुलना करू नये
मुलांच्या भविष्यासाठी पती-पत्नीत सुसंवाद आवश्याक आहे.
घरातील वातावरण अधिक खेळीमेळीचं असायला हवं
स्पर्धा, प्रतिष्ठा यांचा बाऊ करू नका
मुलांना स्वाभाविकपणे घडू द्या
 
परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?
 
संपूर्ण टेक्स्टबुक वाचू नये
उत्तरांचे की वर्डस वाचावेत
पुस्तकातील केवळ हेडिंग वाचावेत
विज्ञानाच्या आकृत्या पहाव्यात
सरावाची छोटी वही जवळ ठेवावी
परीक्षेसंदर्भातील साहित्याची तयारी करून ठेवा
 
प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काय करावं?
 
परीक्षा केंद्रावर साधारण अर्धा तास आधी पोहोचावं
पर्यवेक्षक ज्या सूचना देतील त्या व्यवस्थित ऐकाव्यात
पर्यवेक्षकाशिवाय अन्य कुणालाही काहीही विचारू नये
उत्तरपत्रिका हातात पडल्यावर तिची पानं,क्रमांक पहाव्यात
उत्तरपत्रिकेवर व्यवस्थित आसन क्रमांक लिहावा
प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून घ्यावी
प्रश्नापूर्वीच्या सूचना नीट वाचाव्यात
 
परीक्षेआधी कुठल्याही प्रकारचे टेंशन न घेता बिनधास्त परीक्षा द्या. हाच सल्ला विद्यार्थ्यांना दिला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014, 17:32


comments powered by Disqus