राष्ट्रवादीत बदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?,Bhaskar Jadhav to change the NCP in major reshuffle

राष्ट्रवादीत फेरबदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?

राष्ट्रवादीत फेरबदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रीवादीने बदल करण्याचे निश्चित केलेय. त्यासाठी विद्यमान भास्कर जाधव यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नव्याने गृहमंत्री आर आर पाटील अथवा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड अपेक्षा आहे. त्यांची नावे आघाडीवरआहेत.

भास्कर जाधव यांच्या जागी राष्ट्रीवादीच्या तीन नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये गृहमंत्री आऱ आर पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभेत पानिपत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी प्रभावी नेतृत्व देण्याची मागणी केल्याचे समजते.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीत फेरबदल होऊ शकतात. आपला मतदारसंघ सांभांळून राज्याच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळू शकेल, अशा नेत्याच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडू शकते. यामध्ये स्पर्धेत आर आर पाटील आणि सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 12:28


comments powered by Disqus