भायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!, bhaykhala bridge closed for 15 days

भायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!

भायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भायखळ्याचा पूल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. पुलाच्या डागडुजीच्या कामामुळे हा पूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे सध्या दादरकडून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झालाय.

डागडुजीच्या कामासाठी भायखळा पूल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पुढच्या १५ दिवसांसाठी पूल बंद राहणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोणताही पूर्वसूचना न देता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने डॉ. आंबेडकर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. हा पूल वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत आणखी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागणार असल्याने अशीचा परिस्थिती राहील, असंच चित्र दिसतंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 18:20


comments powered by Disqus