Last Updated: Saturday, January 25, 2014, 07:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राज्यसभेसाठी भाजपनं अन्य राज्यांतील उमेदवारांची घोषणा केलीय. मात्र महाराष्ट्रातील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळं जावडेकरांची ही जागा रिपाइं नेते रामदास आठवलेंना मिळणार का याकडं लक्ष लागलंय.
दरम्यान शुक्रवारी विसावा अतिथीगृहात रिपाइं कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळेंसह प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळं आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का याची उत्सुकता लागलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 25, 2014, 07:19