कॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले, BMC officials arrive at Campa Cola Compound

कॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले

कॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली. मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे येथे तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

रहिवाशांनी कॅम्पाकोला परिसरात होम हवन केले. त्यानंतर सर्वच रहिवासी गेटसमोर एकवटले होते. पालिका अधिकारी येताच त्यांना गेटवर रोखून धरत कारवाई करण्यास मज्जाव केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी गेटवर रहिवाशी हात जोडून पालिका अधिकाऱ्यांना गयावया करीत होते.

सकाळी कॅम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावली होती. आज फक्त गॅस आणि वीज तोडली जाणार होती. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाही. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाईल, असे स्पष्ट केलं. त्यामुळे रहिवाशांचा विरोध पाहता पालिका आता काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 12:51


comments powered by Disqus