कॅम्पा कोलावर आज कारवाई , बँरिकेडस लावण्यास सुरूवात, Campa Cola on this action in Mumbai

कॅम्पा कोलावर आज कारवाई , बॅरिकेडस लावण्यास सुरूवात

कॅम्पा कोलावर आज कारवाई , बॅरिकेडस लावण्यास सुरूवात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई होणार आहे. आज फक्त गँस आणि वीज तोडली जाणाराय. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाहीय. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाणाराय. कँम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावण्यास सुरूवात केलाय.

13 नोव्हेंबर २०१३. याच दिवशी कँम्पाकोला रहिवासी आणि बीएमसी कर्मचारी आमनेसामने आले होते. आणि बळजबरी करत कारवाईला सुरुवात झाली होती. आता तशीच परिस्थिती शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजल्यानंतर असणार आहे. पण फक्त यावेळी मुंबई महापालिका गेल्या वेळेप्रमाणे बळजबरी करून किंवा पोलीस बळाचा वापर करून आतमध्ये कारवाईसाठी घुसणार नाही. तर महापालिका शुक्रवारी फक्त गॅस आणि वीज कनेक्शन तोडणार आहे.

पुढचे तीन दिवस केवळ गॅस आणि वीज कनेक्शन तोडलं जाईल. त्यानंतर आतल्या भिंती तोडल्या जाणार आहेत. तर उर्वरित स्ट्रक्चर तिस-या टप्प्यात तोडलं जाणार आहे. पालिकेची कारवाईची तयारी पूर्ण झाली असली तरी रहिवासी मात्र कुठल्याही परिस्थितीत घरं सोडायला तयार नाहीत.

रहिवाशांनी शुक्रवारी कारवाईला विरोध केला तर मुंबई महापालिका पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि रहिवाशांविरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल. तसंच संपूर्ण कारवाईचं महापालिका व्हिडिओ शुटींग करणार आहे.

यावेळी महापालिका जबरदस्तीनं कारवाई करणार नाही आणि तर दुसरीकडे रहिवासीही मात्र तीव्र विरोध करणार आहेत. याचा अर्थ पालिका पुन्हा कोर्टात जाणार. त्यातच विधानसभा निवडणुकापर्यंत कारवाई होऊ नये, अशी राज्य सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख असाच सिलसिला सुरू राहणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 07:49


comments powered by Disqus