मुंबईत बीएमडब्ल्यूने दोघा पोलिसांना उडवले, BMW car hits two policemen in Mumbai

मुंबईत बीएमडब्ल्यूने दोघा पोलिसांना उडवले

मुंबईत बीएमडब्ल्यूने दोघा पोलिसांना उडवले

www.24taas.com, मुंबई
बीएमडब्ल्यूने 2 पोलिसांना धडक दिल्याची घटना घडलीय. एमएच 14 डीएफ 666 या क्रमांकाच्या भरधाव वेगानं जाणा-या बीएमडब्लू कारनं एका कारसह दोन पोलिस पोलिसांना धडक दिली.

मुंबईच्या पेडर रोडवर ही घटवना घडलीये. श्यामसुंदर निकम आणि मधुकर सिंघाडे अशी जखमी पोलिसांची नावं आहेत. घटना घडल्यानंतर फरार झालेला कारचालक अनिल राऊत आणि त्याची मैत्रिण अर्चना वाघमारे यांना गावदेवी पोलिसांना अटक केलीये.

गावदेवी येथील चेक पॉइंटवर दोन्ही पोलिस उभे होते. पोलिसांनी बीएमडब्ल्यू थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने कार थांबविली नाही. चालकाने दारू प्यायल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही पोलिसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाला आज कोर्टात हजर करणार आहे.

First Published: Monday, April 8, 2013, 10:01


comments powered by Disqus