‘भरधाव वेग’ पोलिसांच्या जीवावर उठलाय!, two different accident in mumbai

‘भरधाव वेग’ पोलिसांच्या जीवावर उठलाय!

‘भरधाव वेग’ पोलिसांच्या जीवावर उठलाय!
www.24taas.com, मुंबई

गुरुवारच्या रात्रीनं मुंबईकरांनी पुन्हा दोन वेगवेगळ्या अपघातांची बातमी दिलीय. या दोन अपघातांत दोन जणांनी आपले प्राण गमावलेत तर १२ जण गंभीर जखमी झालेत.

मुंबईतील पहिला अपघात घडलाय तो मरिन लाईन्सवर... ‘क्विन्स नेकलेस’च्या रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या ऑडी कारनं पाच जणांना उडवलं. जखमींमध्ये चार पोलीस आणि एका नागरिकांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री मरिन लाईन्सच्या पोलीस जिमखाण्याजवळ ही घटना घडलीय. हे सर्व पोलीस नाका बंदीवर होते. कारचालक दिनेश खांडेकरला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, अपघातामधील जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं असून यापैंकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

तर दुसरा अपघात घडलाय तो मुंबई – गोवा महामार्गावर... या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत तर आठ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

First Published: Friday, April 19, 2013, 08:35


comments powered by Disqus