Last Updated: Wednesday, August 21, 2013, 10:40
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई मुंबईत रूग्णांना शिरा, उपमा किंवा पराठा मिळणार आहे. डॉक्टरांपाठोपाठ आता रुग्णांनाही सकाळची न्याहरी देण्यात येणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा होऊन घेण्यात आलाय.
प्राथमिक स्तरावर महानगरपालिकेच्या आठ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही न्याहरी दिली जाणार आहे. न्याहरीमध्ये शिरा, उपमा किंवा पराठा असेल. आजार आणि उपचार यांचा विचार करून यापैकी कोणते पदार्थ द्यायचे हे ठरवले जाईल. पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना सकाळची न्याहरी म्हणून चहा किंवा दुधाबरोबर दोन ब्रेड स्लाइस दिले जातात. ते पचण्यास जड असल्याने रुग्ण खात नाहीत. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याचा विचार होता.
रुग्णालयाच्या कॅण्टीनमधून इतर पदार्थ मागवतात. उपनगरातील १६ रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम न्याहरी दिली जावी याबद्दल आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. स्वतःचे स्वयंपाकघर आहे अशा ८ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरुवातीला ही न्याहरी सुरू करावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा मलिक यांनी सांगितले. अन्य रुग्णालयांमध्येही अशी न्याहरी सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 10:40