भावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत , brother killing brother in mumbai

भावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत

भावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या लहान भावाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर चिडलेल्या भावाने रागाच्या भरात त्याला चाकूने भोसकले. हा प्रकार दादरमधील शिवाजी पार्क परिसरात गुरुवारी रात्री घडला. हत्याकेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाच्या मृतदेहाजवळच तो बसून रडत होता. त्याला पोलिसांनी अटक केली.

रानडे रोडवरील झेलसन झेस्ट या आईस्क्रीम पार्लरमध्ये काम करणाऱ्या नवीन विद्याराम गोस्वामी याचा लहान भाऊ जितूराज याचे अलीगढ येथील एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. जितूराज या महिलेला दर महिन्याला काही पैसेही पाठवीत होता. लहान भावाचे हे प्रकरण नवीनला पसंत नव्हते. विवाहित महिलेमुळे लहान भाऊ बिघडत चालल्याचे पाहून नवीन याने या महिलेच्या घरी फोन करून तिच्या पतीला याची माहिती दिली होती.

मोठ्या भावाने फोन केल्याचे समजातच लहान भाऊ संतापला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो नवीन काम करीत असलेल्या आईस्क्रीम पार्लरवर पोहोचला. यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडन झाले. आधी रागत असलेल्या मोठा भाऊ संतप्त झाला. त्याने आईस्क्रीम कापण्याचा चाकू उचलून जितूराजवर हल्ला केला. जितूराज रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला. गंभीर झालेला जितूराजचे निधन झाले.

रागाच्या भरात आपल्या हातून काय झाले हे, असे म्हणत आपल्या कृत्याचा पश्‍चात्ताप होऊन नवीन त्याच्या मृतदेहाजवळच बसून हमसून हमसून रडू लागला. हा प्रकार पाहाणाऱ्या काही रहिवाशांनी पोलिसांना कळविले. शिवाजी पार्क पोलिस तातडीने तेथे पोहोचले. जितूराजचा मृतदेह त्यांनी तातडीने केईएम रुग्णालयात पाठविला. त्यानंतर नवीनला अटक केली.

दरम्यान, रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे नवीनने पोलिसांना सांगितले. याबाबची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड यांनी दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 08:15


comments powered by Disqus