Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकॅम्पाकोलासाठी कायदा मोडणार नाही, ठरल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
कॅम्पाकोलावासियांवर कारवाई करु नका, या मागणीसाठी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे उत्तर दिलं आहे.
तर दुसरीकडे कॅम्पाकोला रहिवाशांनी विरोध सुरूच ठेवला तर पोलीस बळाचा वापर करण्याचीनी अजूनही महापालिकेला विरोध आता अर्ध्या तासाची मुदत दिलीय. त्यानंतर पुढच्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
आजही कारवाईसाठी महापालिका अधिकारी कॅम्पाकोलात दाखल झालेत. वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याची महापालिकेची तयारी आहे.
पण कॅम्पाकोला रहिवाशांचा कारवाईला विरोध कायम आहे. आजही त्यांनी विरोध कायम ठेवला तर पोलीस बळाचा वापर करण्यात येईल, असे संकेत महापालिका अधिका-यांनी दिलेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 22, 2014, 16:33