Last Updated: Tuesday, November 19, 2013, 20:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिलाय. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत.
याचसोबत ‘आम्ही आमची घरं रिकामी करू’ असं सांगणारं हमीपत्रही कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना सहा आठवड्यात सादर करावं लागणार आहे. तसं हमीपत्र दिलं नाही तर २७ फेब्रुवारीनंतर कारवाई करण्याची मुभा महापालिकेला देण्यात आलीय. त्याचबरोबर अॅटर्नी जनरल वहनवट्टी यांनी पुर्नवसनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आजच्या कोर्टाच्या आदेशांमुळे अनधिकृत फ्लॅट धारकांना जागा रिकामी करण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचं दिसतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 20:05