Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने नव्याने नोटीस पाठवली आहे. १२ जूनला संध्याकाळपर्यंत चाव्या ताब्यात देण्याबाबत या नोटीशीत म्हटलंय.
जी साऊथ वॉर्डमध्ये या चाव्या जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तर कॅम्पाकोला प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळे सरकार काही करु शकत नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्विट केलंय. बिल्डरच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्यांना भोगावी लागतेय, हा अन्याय असल्याचं लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 07:55