Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे.
काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात शिवलाल मेघजी यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ७ जणांपैकी सहा जखमींना स्थानिक रूग्णालयात नेण्यात आलं.
कारचालक श्रीकांत तिवारी हा पत्रकार आहे. तो भरधाव वेगाने चारकोप येथील सह्याद्री नगराच्या दिशेने जात होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 20:07