गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!, car sales & price comes down

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!
www.24taas.com, मुंबई

बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.

देशात कार बनवण्याची संख्या वाढतेय मात्र त्यांच्या विक्रीत घट होताना दिसतेय. जसजशी गाड्यांच्या विक्रीत घट होतेय तसतशी कंपन्यांच्या चिंतेत वाढ होतेय. ज्या गाड्यांची विक्री कमी होतेय, अशाच गाड्यांवर या कंपन्यांनी डिस्काऊंट ऑफर दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत गाड्यांच्या विक्रीत किती घट झालीय... पाहा...
महिना गाड्यांच्या विक्रीत घट
फेब्रुवारी 2013 -13.00 %
जानेवारी 2013 -12.45 %
डिसेंबर 2013 -12.50 %
नोव्हेंबर 2013 -8.25 %

पॅसेंजर गाड्यांच्या विक्रीत घट होत असली तरी ‘एसयूव्ही’ सेगमेंटमध्ये मात्र चांगली विक्री पाहायला मिळत होती. मात्र, बजेटनंतर किंमती वाढल्याने जर विक्रीवर परिणाम झाला तर कंपन्यांना या सेगमेंटमधल्या गाड्यांवरही डिस्काऊंट देणं क्रमप्राप्त होईल.

कोणत्या गाडीवर किती रुपयांची मिळतेय ऑफर... पाहा...
कार ऑफर
टाटा मान्झा 29 ते 50 हजार रु.
मारुतीही एसएक्स-4 30 ते 60 हजार रु.
मारुती वॅगन-आर 15 ते 35 हजार रु.
मारुती ए-स्टार 25 ते 35 हजार रु.
व्होक्सवॅगन वेंटो 37 हजार रु.
ह्युंदाई आय-10 37 हजार रु.
ह्युंदाई सँट्रो 40 हजार रु.

First Published: Wednesday, March 6, 2013, 10:34


comments powered by Disqus