हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

तेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:35

भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 10:36

बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.

कर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन

Last Updated: Thursday, October 11, 2012, 19:02

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.

सलमानची 'यारी', कॅटला गिफ्ट दिलं 'भारी'

Last Updated: Thursday, July 19, 2012, 16:41

आपल्या आवडत्या व्यक्तींना महागड्या भेटवस्तू देण्याबद्दल सलमान खान प्रसिद्धच आहे. त्यात जेव्हा त्याची ‘मैत्रीण’ कतरिना कैफ हिचा वाढदिवस असेल, तेव्हा तर सलमान पैशाचा विचार न करता तिला भेटवस्तू देणार हे तर नक्कीच..

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ

Last Updated: Friday, March 30, 2012, 13:14

रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.

रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा

Last Updated: Monday, April 2, 2012, 12:43

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला.

सुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 18:22

भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

'पार्श्वगायिका' आर्या आंबेकर

Last Updated: Thursday, November 3, 2011, 11:25

आर्याने नुकतंच एका मालिकेच्या शीर्षकगीताला स्वरसाज चढवला आहे. सारेगमप लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेली प्रिटी यंग गर्ल आर्या अंबेकर आपल्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर घालायला सज्ज झाली आहे.