राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत! celebration of gudi padwa

राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.

आज ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारुन नवीन वर्षाचं स्वागत केलं जातंय. गुढी उभारणं ही भारतीय संस्कृतीतील जुनी परंपरा आहे. गुढीपाडवा म्हणजे पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.

गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी शोभयात्रा निघाल्यात. याशोभायात्रेत ढोल-ताशे, लेझीम, विविध कला या वातावरणात सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. काही शोभायात्रेत सामाजिक संदेशही दिला जातोय. तसंच ह्या चैत्र महिन्यात वसंत ऋतूला सुरुवात होते. या वसंत ऋतूत कोकिळेचे स्वर, निष्पर्ण झालेल्या झाडावर फुललेली पालवी बघायला मिळत आहे.

रेशमी कापडं गुंडाळलेली, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ घातलेली अशी गुढी सजवून आनंद सगळीकडे साजरा केला जातोय. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे. अशा या पाडव्याच्या शुभदिनी सर्व प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 31, 2014, 11:02


comments powered by Disqus