मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा! central railway is introduce new CCOM facility

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

www.zee241taas.com, झी मिडीया, मुंबई

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.

या मशीनची किंमत सात लाख ते आठ लाख रुपये असून, `क्रिस` ही कंपनी या मशीनची निर्मिती करतेय. या मशीनमध्ये तिकीट दराप्रमाणे पैसे टाकले की, तिकीट मिळेल. विशेष म्हणजे ही मशीन नाणी, नोटा तसंच एटीव्हीएम कार्ड ही स्वीकारते. मात्र या मशीनमध्ये दोन रुपयांचे नाणे स्वीकारले जाणार नाही.

सध्या ही मशीन प्राथमिक चाचणीसाठी सीएसटी स्थानकांवर बसवलेली असून, लवकरच मुंबईमधील सगळ्या रेल्वे स्थानंकावर १४० मशीन बसविण्यात येतील. त्यापैकी ११७ मशीन प्रमुख उपनगरीय स्टेशन समाविष्ट आहेत.

उपनगरीय स्टेशनमध्ये सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, डोंबिवली, मुलुंड ही मध्ये रेल्वेची प्रमुख स्थानके आणि वडाळा रोड, वाशी, मानखुर्द, पनवेल, बेलापूर ही हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश करण्यात येईल.

सीसीओएम मशीनमध्ये काही तांत्रिक दोष आढळल्यास त्यामध्ये बदल केले जातील. तसेच या मशीन बसविण्याचा उद्देश दिवसभरात जास्तीत जास्त तिकीट विक्री व्हावी असा असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 15:35


comments powered by Disqus