Last Updated: Friday, December 14, 2012, 17:36
www.24taas.com, मुंबई मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय. सिग्नल दुरुस्तीचं काम रेल्वेनं तातडीनं हाती घेतलंय. पण, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मात्र परिणाम झालाय. रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं होतेय.
दुपारची वेळ असल्यानं आणि अजून कामाची वेळ संपली नसल्यानं नोकरदार वर्गावर फारसा परिणाम मात्र अजून जाणवलेला नाही.
First Published: Friday, December 14, 2012, 17:32