Last Updated: Wednesday, December 19, 2012, 13:04
www.24taas.com, नवी दिल्ली राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच राष्ट्रीय राजकारणात उडी घेणार असल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेलेत. भुजबळांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षानं घेतल्याचं समजतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत तर समीर भुजबळ यांच्या जागी ते स्वत:च लोकसभेची निवडणूक लढवतील, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये ते लोकसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरून दिल्लीला जाण्याचा निर्धार पक्का करतील, हे स्पष्ट होतंय.
पण, यावेळी छगन भुजबळ राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
First Published: Wednesday, December 19, 2012, 10:48