मलबार हिल नाही ‘रामनगरी’ म्हणा - मनसे, change name malbar hill as ramnagari - mns

मलबार हिल नाही ‘रामनगरी’ म्हणा - मनसे

मलबार हिल नाही ‘रामनगरी’ म्हणा - मनसे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मलबार हिलचं रामनगरी नामकरण करण्यात यावं, अशी मागणी मनसेनं मुंबई महापालिकेकडे केलीय. गेल्या काही काळात भाजपशी मनसेशी वाढती सलगी तर त्यास कारणीभूत नाहीना अशी चर्चा आता सुरु झालीय.

भाजपपाठोपाठ मनसेनंही दिलाय ‘जय श्रीराम’चा नारा... मलबार हिलचे नाव रामनगरी करा अशी मागणी मनसेनं महापालिकेकडे केलीय. मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे मलबार हिलचे रामनगरी असे नामांतर करण्याची मागणी केलीय. मलबार हिल हे ब्रिटीश कालीन नाव असल्यानं त्यावर लांडेंनी आक्षेप घेतलाय. ‘रामनगरी’ हेच नाव योग्य असल्याचं पटवून देण्यासाठी लांडें यांनी पुराणाचे दाखलेदेखील दिले आहेत. लांडेच्या या मागणीवर महापालिकेत प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. त्यानुसार भाजपनं लांडेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय तर तर काँग्रेसनं मात्र विरोध केलाय.

कुठल्याही पद्धतीच्या नामांतराला विरोध असल्याची भूमिका याआधी राज ठाकरेंनी मांडलीय. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या गटनेत्यानं मलबार हिलचं नामांतर कऱण्याची सूचना केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. ‘जय श्रीराम’चा नारा देण्यामागे गेल्या काही दिवसांतील भाजप नेत्यांच्या कृष्णकुंजवरील वाढत्या फेऱ्या तर कारणीभूत नाहीत ना? अशी चर्चा या निमित्तानं रंगलीय. निसर्गाच्या सानिध्यात गगनचुंबी इमारतींध्ये राहाणाऱ्या ‘उच्चभ्रूंची वसाहत’ अशी मलबार हिलची ओखळ... या मलबार हिलमध्ये मराठी माणसाचा टक्का टिकवणं महत्त्वाचं की नामांतर? याबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 08:37


comments powered by Disqus