Last Updated: Friday, June 21, 2013, 23:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत राज ठाकरेंच्या मनसेला घेण्यास आपण इच्छुक असल्याचे म्हटले होते. यावर राज यांनी भाजपला कानपिचक्या दिल्यात. महायुतीबाबत जे भाजपने उद्योग सुरू ठेवलेत ते बंद करावेत. आपल्या पक्षात काय चाललेय, त्यात लक्ष घाला, असा टोला राज यांनी हाणला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही एकत्र आणणार. एवढेच नव्हे तर मनसेला महायुतीत आणू, अशी शुकशुक करण्यात येत आहे. मात्र, असे घाणेरडे राजकारण बंद करा. आम्हाला बदनाम करण्याचे खुळचट राजकारण करू नका, असे स्पष्ट राज यांनी भाजपला सुनावलेय. त्यांनी तशी माहिती एका मराठी वृत्तपत्राला दिलेय. मनसे युतीत आल्यास सत्तेचे गणित अधिक सोपे होईल, अशा आशावाद देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यावर राज यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.
महायुतीबाबत वृत्तपत्रातून चर्चा झडत आहेत. यातील कही नेता आजपर्यंत आपल्याशी बोललेला नाही. जे काही चालले आहे ते बाहेरच्या बाहेर सुरू आहे. वृत्तपत्रातून कोणी ‘टाळी’ मागत नसते, असे आधी मी जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. भाजपने आपल्या पक्षात काय चाललं आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नको त्या भानगडीत पडू नये, असे राज ठाकरे यांनी भाजपला फटकारलेय. भाजपबद्दल मी परस्पर काही विधाने केली तर ती चालतील का, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 21, 2013, 23:22