Last Updated: Thursday, June 13, 2013, 11:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.
राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात ही माहिती दिली. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, ते अस्पष्ट असल्याने तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यात कोणाचे चेहरे दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सरकारी कर्मचार्यां ना मारहाण केल्याप्रकरणी आमदार राम कदम यांना मंगळवारी पंतनगर पोलिसांनी अटक केली. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची ३५ हजारांच्या जामिनावर सुटका केली.
घाटकोपर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पालिकेचे साहाय्यक अभियंता महेश फड यांना २१ जानेवारीला त्यांच्या कार्यालयात शिरून काही महिलांनी मारहाण केली होती. त्याच दिवशी कदम यांनी फोनवरून धमकावल्याची तक्रार फड यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 11:32