आमदार राम कदम, क्षितिज ठाकूरांवर आरोपपत्र

Last Updated: Thursday, June 13, 2013, 11:32

वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.