`बीग बॉस`फेम अपूर्व-शिल्पा अग्निहोत्री अडचणीत, charges fixed on shilpa-atul agnihotri

`बीग बॉस`फेम अपूर्व-शिल्पा अग्निहोत्री अडचणीत

`बीग बॉस`फेम अपूर्व-शिल्पा अग्निहोत्री अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत जुहू भागात २०१३ साली साली पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी `बीग बॉस` फेम अपूर्व अग्निहोत्री आणि पत्नी शिल्पा अग्नीहोत्री या जोडप्यासहीत ८६ जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेत.

२०१३ साली मे मुंबईत जुहू भागातील ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलं होतं. याच पार्टीत शिल्पा आणि अपूर्व अग्निहोत्री यांचाही समावेश होता. वैद्यकीय तपासणीत अपूर्व अग्निहोत्री याच्‍या रक्ताचा नमुना पॉझिटीव्‍ह आढळला होता.

अपूर्व अग्निहोत्री त्याची पत्नी शिल्पा, आयपीएल क्रिकेटर राहुल शर्मा आणि इतर ८६ जणांवर अमली द्रव्यप्रतिबंधक विशेष न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले असून याबाबतच्या आरोपत्रांची प्रत त्यांना पाठवली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ६ मार्च रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर वेन पार्नेल याला फरार दाखवण्यात आले आहे.

याप्रकरणी, पोलिसांच्या कारवाईनंतर अपूर्व-शिल्पा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरणही दिलं होतं. आपल्याला एका वाढदिवसाचं आमंत्रण होतं... ही रेव्ह पार्टी असल्याचं आपल्याला माहित नव्हतं, असं स्पष्टीकरण या दोघांनी दिलं होतं. या रेव्ह पार्टीतून १०० तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये ३८ मुली आणि ५८ मुलांचा समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर यामध्ये सहभागी असलेले ३५ परदेशी नागरिक मायदेशी परतले होते. या सर्व परदेशी नागरिकांना फरार दाखवण्यात आलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 16:34


comments powered by Disqus