`बीग बॉस`फेम अपूर्व-शिल्पा अग्निहोत्री अडचणीत

Last Updated: Monday, February 3, 2014, 17:14

मुंबईत जुहू भागात २०१३ साली साली पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी `बीग बॉस` फेम अपूर्व अग्निहोत्री आणि पत्नी शिल्पा अग्नीहोत्री या जोडप्यासहीत ८६ जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेत.

मुंबईत गे रेव्ह पार्टी, चार तरूणींसह ३१ जणांना अटक

Last Updated: Saturday, September 28, 2013, 09:35

मुंबई पोलिसांनी ओशिवरा परिसरातल्या एरा पबमध्ये सुरु असलेली गे रेव्ह पार्टी उधळलली आहे. पोलिसांनी या पबवर रात्री १ च्या सुमारास धाड टाकून ३१ जणांना अटक केली. यामध्ये चार तरूणींचा समावेश आहे.

फ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!

Last Updated: Friday, September 6, 2013, 19:18

रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.

मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 11:09

पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.

वेन पार्नेलने पत्करली शरणागती

Last Updated: Thursday, April 11, 2013, 15:49

दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू वेन पार्लेनने पोलिसांच्या तीन तास कसून चौकशीनंतर शरणागती पत्करली आहे. गेल्या वर्षी जुहू पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी रंगेहाथ पकडले होते.

रेव्ह पार्टी: राहुल शर्मासह ४२ जण दोषी

Last Updated: Friday, July 20, 2012, 22:38

जुहूतल्या ‘ओकवूड’ रेव्ह पार्टीत आपण ड्रग्ज घेतलंच नव्हतं, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या राहुल शर्माची टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे त्याने या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालंय. तसंच वेन पार्नेलसह इतर ४२ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात.

जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश

Last Updated: Sunday, June 24, 2012, 15:44

जुहूतील येथील ओकवूड प्रीमिअर या आलिशान हॉटेलात २० मे रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदर्थांचं सेवन करणा-यांमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असल्याचं उघड झाले आहे.

रेव्ह पार्टीतले 'ते' ४४ जण निघाले 'नशेबाज'

Last Updated: Friday, June 22, 2012, 21:14

जुहूतल्या ओकवूडमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी ४४ जणांनी ड्रग्ज घेतल्याचं उघड झालं आहे. या पार्टीमधल्या ४६ जणांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४४ लोकांना ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं आहे.

कोल्हापुरात रिसॉर्टवर रेव्ह पार्टी

Last Updated: Monday, June 4, 2012, 19:53

कोल्हापूर शहराजवळ एका हॉटेलमधल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. सादळे-मादळे इथं एका रिसॉर्टवर रेव्ह पार्टी सुरु असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.

रेव्ह पार्टीचे सूत्रधार मोकाट

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:27

मुंबईतील जुहू रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्याला दहा दिवस उलटलेत. तरीही पार्टीची आयोजक तरुणी आणि ड्रग पेडलरला पकडण्यात पोलिसांना अपयश आलय. मुंबई पोलिसांचं हे अपयश म्हणावं लागेल.

ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:28

मुंबईत जुहू इथल्या रेव्ह पार्टी प्रकरणी ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

रेव्ह पार्टीतील 'त्या' महिलेचं गूढ वाढलं

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 12:06

मुंबईतल्या ओकवूड हॉटेलमधील रेव्ह पार्टीचं गूढ आणखीनच वाढलंय. या रेव्ह पार्टीची मुख्य सूत्रधार महिला असल्याचं समोर आलंय. आयपीएलच्या खेळाडूंना पार्टीत आणण्यात याच महिलेनं पुढाकार घेतल्याचंही समोर आलंय.

'वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो...'

Last Updated: Monday, May 21, 2012, 16:00

... ती रेव्ह पार्टी होती, याची मला किंचितही नव्हती कल्पना. मी तर वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो, असं राहूलचं म्हणणं आहे.

आयपीएल संगे, रेव्ह पार्टी रंगे!

Last Updated: Monday, May 21, 2012, 14:08

मुंबईतल्या रेव्ह पार्टीत आणखी एक नवा खुलासा समोर आलाय. या रेव्ह पार्टीत आयपीएलचे दोन नव्हे तर सहा खेळाडू होते. मात्र पोलिसांच्या रेडपूर्वीच इतर चार खेळाडू पसार झाल्याचं समोर आलंय.

रेव्ह पार्टीत मनिषा कोईरालाही सहभागी

Last Updated: Monday, May 21, 2012, 09:50

मुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.

रेव्ह पार्टीत पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू

Last Updated: Monday, May 21, 2012, 07:39

मुंबईत जुहूच्या ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहूल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलंय.

जुहूत रेव्ह पार्टीवर छापा...

Last Updated: Sunday, May 20, 2012, 23:29

रविवारी, पोलिसांनी मुंबईत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेतलं गेलंय. पार्टीसाठी आणलेले अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केलेत.