मुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम Chhota chava mothi bhiti is new campaign by mumbai munic

मुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम

मुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.

फेंगशुईनुसार, वास्तुशास्त्रात हिरव्या रंगाचे लकी बांबूचे झाड घरात किंवा ऑफ‌िसमध्ये ठेवलं की घरात शुभ गोष्टी चालू होतात असे मानले जाते. हे बांबू नेहमीच साध्या पाण्यात ठेवले जातात. पण डासांची पैदास देखील याच पाण्यात होते. महानगर पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मध्यंतरी गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि अन्य भागांत पाहणी केली असता, बांबू ठेवलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डासांच्या अळ्यांची पैदास झाल्याचे आढळून आले.

मुंबईत मलेरिया-डेंग्यूची साथ ही पावसाळ्यात नेहमीच वाढते. याच कारणाने येत्या पावसात पालिकेने `छोटा चावा मोठी भीती` या धोरणाखाली मुंबईभर मोहीम सुरू केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 20:23


comments powered by Disqus