Last Updated: Wednesday, April 10, 2013, 15:18
www.24taas.com , मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक खुशखबर. चर्चगेट- डहाणू लोकल १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातलं प्रसिद्धपत्रक सादर करण्यात आले आहे मात्र त्याचवेळी पश्चिम रेल्वेने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
चर्चगेट-डहाणू लोकल विषयावरून अनेक दिवस चर्चा रंगत होती. परंतु या प्रसिद्धपत्रकामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. खासदार बळीराम जाधव यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच त्यांनी या लोकलबाबत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या कानावर ही बाब घातली होती.
बन्सल यांनी महाव्यवस्थापकांशी चर्चा करून १६ एप्रिलपासून चर्चगेटला जाणाऱ्या पहिल्या गाडीचा शुभारंभ डहाणू येथे करण्याचे पत्र दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
First Published: Wednesday, April 10, 2013, 15:18