प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन

Last Updated: Saturday, March 1, 2014, 10:09

प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. त्यामुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

डहाणूत फुगा कंपनीला भीषण आग

Last Updated: Thursday, January 30, 2014, 09:37

`नॅशनल टॉय  प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड` नावाच्या या कंपनीत लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही मनुष्य हानी झाली नसली तरी लाखोच सामान जळून खाक झालंय.

डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला आग, नऊ ठार

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 13:16

ठाणे जिल्ह्यातील डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत ७ ठार झाले आहेत. डहाणू-घालवडजवळ ही आग लागली आहे.

ठाण्यात पावसाचा बळी, २५ गावांचा संपर्क तुटला

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59

ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.

गार्डला विसरून गाडी धावली!

Last Updated: Friday, June 28, 2013, 16:49

चर्चगेट- डहाणू लोकलचा गार्ड पालघर स्टेशनवर चहा प्यायला उतरला असतानाच मोटरमनने ट्रेन सुरू केली आणि ही ट्रेन पालघर ते बोईसरदरम्यान गार्डच्या गैरहजेरीत धावली.

डहाणू-चर्चगेट लोकलचे जल्लोषात स्वागत

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 20:08

डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाली. सकाळी ११च्या सुमारास डहाणू स्टेशनमधून ही लोकल चर्चगेटसाठी सुटली आणि तमाम पालघर-डहाणूवासियांनी आनंदोत्सव साजरा केला... ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर नव्या लोकलचं जंगी स्वागत करण्यात आलं..

खुशखबर : चर्चगेट-डहाणू रेल्वेचा शुभारंभ

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 09:46

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून चर्चगेट ते डहाणू अशी लोकलसेवा सुरू होतेय. या मार्गावर २० लोकलसेवा आणि चार शटलसेवा सुरू होत आहेत. या नवीन सेवेमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

चर्चगेट-डहाणू लोकल १६ एप्रिलपासून?

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 15:18

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक खुशखबर. चर्चगेट- डहाणू लोकल १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातलं प्रसिद्धपत्रक सादर करण्यात आले आहे मात्र त्याचवेळी पश्चिम रेल्वेने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

मुंबईकरांना ‘एमयूटीपी’तून दिलासा मिळणार?

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 10:09

जोपर्यंत ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाही.

चर्चगेट ते डहाणू... डायरेक्ट!

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 22:42

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. येत्या ३१ मार्चपासून विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील लोकल चर्चगेट ते डहाणूपर्यंत धावणार आहे.

`काँग्रेस म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालयं राव....`

Last Updated: Saturday, October 27, 2012, 09:30

`काँग्रेस म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं आहे` हे कोणा सामान्य माणासाचं वाक्य नाही. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसवर उधळलेली स्तुतीसुमनेच म्हणावी लागतील.