…’तो’ फ्लॅट मुख्यमंत्री सरकारला परत करणार, cm will return bhakti park flat to government

…’तो’ फ्लॅट मुख्यमंत्री सरकारला परत करणार

…’तो’ फ्लॅट मुख्यमंत्री सरकारला परत करणार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भक्ती पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या भाडेकरू राहात असल्याचं वृत्त ‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रासह ‘झी मीडिया’नेही दाखवलं होतं. त्यानंतर हा फ्लॅट सरकारला परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीने घेतलाय.

मुख्यमंत्र्यांना २००३ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या फ्लॅटमध्ये स्नेहल पुजारी ही महिला राहात असल्याची माहिती मिळाली होती. त्या महिलेविरूद्ध सोसायटी मेंबर्सनी तक्रार केली होती. ‘ही महिला आम्ही सीएमची माणसं आहोत, तुम्ही आमचं वाकडं करू शकत नाही’ अशा स्वरूपाची धमकीही देत होती. त्यामुळे आता फ्लॅट सरकारला परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013, 23:30


comments powered by Disqus