मुंबईसह महाराष्ट्र गारठला, Cold wave in the Mumbai

मुंबईसह महाराष्ट्र गारठला

मुंबईसह महाराष्ट्र गारठला
www.24taas.com, मुंबई

राज्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. मुंबईचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने चांगलाच गारठा जाणवत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे.

उत्तरेबरोबरच राज्यातही कडाक्याची थंडी पडलीय. नाशिक आणि पुण्यात कडाक्याची थंडी पडलीय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये २.७ अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झालीय. तर आर्थिक राजधानी मुंबईलासुद्धा हुडहुडी भरलीय. मुंबईत या हंगामातल्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद झालीय. मुंबईचं कमाल तापमान १२ अंश सेल्सियस इतकं खाली घसरलंय.

सामान्य तापमानापेक्षा हे तापमान ४.५ अंश सेल्सियसपेक्षा कमी आहे. त्यामुळं मुंबईकरांचा वीकेंड थंडा थंडा कूल कूल ठरलाय.पूर्वेकडे जाणा-या वा-यांमुळं तापमान खाली घसरल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. उत्तरकेडे गारठा वाढत असताना मुंबईतसुद्धा तापमान कमी राहण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई शहराचे किमान तापमान सातत्याने १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे चांगलाच गारवा जाणवत आहे.

उत्तरेकडून राज्याकडे वाहणार्याव थंड वाऱ्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानही खाली घसरले आहे. गेल्या ४८ तासांत राज्यात हवामान मुख्यत: कोरडे नोंदवण्यात आले असले, तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.

नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आलीय. नाशिक ४.४मध्ये अंश सेल्सिअस तर नगर येथे ७.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर पुणे ७.६, मालेगाव ७.४ नोंदवण्यात आले.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. गत २४ तासांत उत्तर प्रदेशात थंडीने आणखी ११ जणांचा बळी घेतला. थंडीचीबळीसंख्या १४० वर पोहोचली आहे.

First Published: Sunday, January 6, 2013, 08:37


comments powered by Disqus