फिल्मसिटीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला आग ‘Comedy Nights with Kapil’ set catches fire

फिल्मसिटीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला आग

फिल्मसिटीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला आग
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या दादासाहेळ फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीतल्या एका सेटला आज सकाळी आग लागली. ही आग प्रसिद्ध कॉमेडी शो असलेल्या `कॉमेडी नाईट विथ कपिल`च्या सेटला लागल्याचं कळतंय.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यात ४ पाण्याचे बंब आणि ४ फायर इंजिन्सचा समावेश आहे.

आगीचं नेमकं कारण अद्याप कळलं नसून आगीमुळं किती नुकसान झालंय हे आग पूर्णपणे विझल्यानंतरच कळेल. कलर्स वाहिनीवर प्रसारीत होणारी 'कॉमेडी नाईट विथ कपिल' ही मालिका फारच लोकप्रिय आहे.

आज सकाळी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असतानाच स्टेजच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला आणि सेटला आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण सेटवर आग पसरली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्मसिटीत फार आतमध्ये हा सेट उभारण्यात आला होता. काही अन्य मालिका आणि टीव्ही शोजचे सेटही त्याच्या बाजूलाच आहेत. हे सगळेच सेट लाकडाचा जास्तीत जास्त वापर करून बनवण्यात आले आहेत. त्यामुळंच आग आणखी पसरू नये म्हणून बाजूचे सर्व सेट रिकामे करण्यात आले आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 10:41


comments powered by Disqus