आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा सेट जळून खाक ‘Comedy Nights with Kapil’ set catches fire

आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा सेट जळून खाक

आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा सेट जळून खाक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आज सकाळी आग लागली होती. या आगीत `कॉमेडी नाईट विथ कपिल`चा संपूर्ण सेट जळून खाक झालाय.

सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझली. आगीचं कारण कळलेलं नाही. आग लागल्याचं कळताच ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’चा निर्माता कपिल शर्मा सेटवर आला. तर पोलीस पुढील तपास करतायत.

कॉमेडी नाईटस विथ कपिलच्या सेटवर लागलेल्या या आगीने अवघ्या काही मिनिटातच सेट जळून खाक झाला.
दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण सेट जळाला होता.

आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असावी, अशी अंदाज वर्तवण्यात येतोय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 15:05


comments powered by Disqus