Last Updated: Friday, October 25, 2013, 20:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहागाई, भ्रष्टाचार,शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध समस्यांनी सामान्य नागरिक हैराण आहेत. दैनंदिन जगण्यातल्या या कटकटी कमी झाल्या म्हणून की काय, बोरिवलीकरांच्या वाट्याला आणखी एक समस्या आलीय. ती म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर लोकल पकडायची? प्लॅटफॉर्म क्रमांक १, ७ आणि ८ चा रेल्वे प्रशासनाने असा काही घोळ घालून ठेवलाय की साधी लोकल पकडणे देखील जिकीरीचं झालंय...
मुंबई आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांचा लोकल प्रवास जीवघेणा झालाय. मात्र बोरीवलीतल्या प्रवाशांसाठी या यातना लोकलमध्ये चढायच्या आधी प्लॅटफॉर्मवरुनच सुरु होतात. बोरीवली हे एकमेव रेल्वे स्थानक असे आहे की जिथे ३ प्लॅटफॉर्म हे एका मागोमाग एक आहेत. म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर १, त्याच्या पुढे प्लॅटफॉर्म नंबर ७ आणि त्यानंतर ८. त्यातच बोरीवली लोकल कुठल्या प्लॅटफॉर्म येणार याबद्दल नेहमीच अनिश्चितता असते.
त्यामुळे लोकल पकडण्यासाठी किंवा लोकलमधून उतरल्यावर किमान ३०० मीटरचा तर कधी चक्क अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजेच २ प्लॅटफॉर्म चालण्याचा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो.
या समस्येवर तोडगा काढू या थातुरमातुर उत्तरापलीकडे रेल्वे अधिका-यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला वेळ नाहीये. मात्र रेल्वे ट्रॅक ओलांडू नका असं सांगणारे पथनाटय आयोजित करण्यासाठी मात्र रेल्वे प्रशासनाकडे वेळच वेळ असल्याचं संतापजनक चित्र आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, October 25, 2013, 20:01