Last Updated: Thursday, August 22, 2013, 08:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभेच्या जागा वाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मतभेद मिटण्याऐवजी वाढलेत. काल रात्री पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी कडून जागा वाटपाच्या मुद्यावरुन केल्या जाणा-या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
२००४ आणि २००९च्या जागावाटपाची चर्चा राज्यातच व्हावी, अशी कॉग्रेसची ठाम भूमिका आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटपाची जागा दिल्लीत झाली असल्याचे स्पष्ट केलंय. दोन्ही पक्ष या मुद्यावरुन ठाम असल्याने समन्वय समितीच्या बैठकीतही या विषयावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे या विषयावरुन दोन्ही पक्षांमधला चर्चेचा डेडलॉक कायम आहे.
राष्ट्रवादीवर नारायण राणे यांनी `प्रहार` केलाय. राष्ट्रवादीकडून कधीही दगाफटका होण्याची भीती उद्यागमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नव्याने वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच काल झालेल्या बैठकीत दोन्ही काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी आपली चर्चा झाली असून राज्यातील काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटलं होतं. पवारांच्या या टीकेला माणिकरांवांनी उत्तर दिलं होतं.
शरद पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना टोला लगावलाय होता. आपण राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी बोलत नाही असं पवारांनी म्हटलंय. राज्यात २६-२२ चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहितीही पवार यांनी दिली होती. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसमध्ये तू तू मै मै सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 08:40