Last Updated: Friday, December 13, 2013, 17:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ५ राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवाव्यात, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारलाय.
काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या जागावाटपाचे सर्वाधिकार शरद पवार आणि सोनिया गांधींना दिले आहेत. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलू नये. त्याचा काही उपयोग नाही, असंही अजितदादा म्हणालेत.
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टार्गेट केलंय. त्यांचं नाव न घेता `लकवा वाढला आहे`, असं अजित पवार म्हणाले...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 13, 2013, 17:38