दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?, dabholkar murder case will handover to CBI

दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?

दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरु असला तरी यामध्ये काहीच प्रगती झाली नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात काल मान्य केलं. मध्य प्रदेश आणि गोवा या दोन राज्यातही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसंच सीबीआयकडे यापूर्वीच भरपूर प्रकरणं असल्याचा युक्तीवाद राज्य सरकारनं केला तर सीबीआयच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी मागच्या सुनावणीच्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यास अनुकुलता दाखवली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास दाभोलकर कुटुंबीयांचा विरोध असल्याचं बोललं जातंय. मात्र, मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं दाभोलकरांचा गौरव केला जातो, पण त्यांच्या मारेकऱ्यांचा काही पत्ता लागत नाही, अशी खंत त्यांच्या मुलांनी व्यक्त केली होती.

यावर हायकोर्ट यावर आज काय निर्णय देणार? याकडं लक्ष लागलंय. अंधश्रद्धेविरोधात लढा देणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात 21 ऑगस्ट 2013 रोजी हत्या करण्यात आली होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 10:19


comments powered by Disqus