Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:08
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईदहीहंडीचा खेळात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खेळाचा दर्जा मिळण्याची हंडी फोडण्याचे प्रयत्न लावण्याआधीच अपेक्षांचा मनोरा कोसळलाय. गेल्या आठवड्यातल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही चर्चाच संपवून टाकली.
खेळाचे नियम ठरवणार कसे? असा प्रश्न विचारत त्यांनी या प्रस्तावालाच नकार दिला. क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यादृष्टीनं नियमावली तयार करण्याचं कामही तयार झालं होतं. मात्र त्याला क्रीडाप्रेमींनी आक्षेप घेतला होता.
मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर काही प्रश्न उपस्थित केले. दहीहंडी हा खेळ केल्यास त्याचे वयोगट कसे ठरवणार, त्याच्या स्पर्धेचं स्वरूर काय असणार असे प्रश्न उपस्थित केले. यावर तोडगा न निघाल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळं आता दहीहंडी हा उत्सवच राहणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 11:08