दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत Dalit can become Sarsanghchalak- Bhagawat

दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत

दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत

www.24taas.com, मुंबई

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.

यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरही भागवत यांनी आपले विचार मांडले. समाजातील भेदभाव जोवर असतो, तोवरच आरक्षणाची गरज असते. सामाजिक विषमता नष्ट होईपर्यंत आरक्षण असावं, मात्र त्याला एक निश्चित काळही असावा. अनिश्चित काळापर्यंत आरक्षण असू नये. असं भागवत म्हणाले.

समाजातील सर्व घटक एका रांगेत येईपर्यंतच आरक्षण गरजेचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच हिंदूंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे, तसंच त्यांच्यातील विषमताही दूर करण्याचा प्रयत्न संघ नेहमी करतो. असं म्हणत प्रथमच आरक्षणावर ठाम भूमिका घेत सरसंघचालकांनी आपले विचार स्पष्ट केले आहेत.

First Published: Wednesday, September 5, 2012, 12:31


comments powered by Disqus