दाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन, death rumor, I`m good - Rajan

दाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन

दाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मला कोणताही आजार नाही. मी चांगला आहे. माझ्या मृत्यूची बातमी दाऊद इब्राहिमकडून पसरविण्यात येत आहे. त्याचाच या मागे हात आहे, असा खुलासा अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन याने केलाय. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाऊद माझ्या जीवावर उठला आहे. पण त्यांच्या गोळ्यांना यश आलेले नाही. 2000 पासून आपल्या मृत्यूच्या अफवा पसरत आहेत; मात्र त्यात काही तथ्य नाही. त्यामुळे दाऊद हा माझ्या मृत्यूची बातमी पसरवित आहे. हे लोक अशा अफवा पसरवून मनाचे समाधान करून घेतात, असे छोटा राजन याने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

छोटा राजन सिंगापूरमध्ये रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. काल रात्री त्याचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर आज राजनने काही वृत्तवाहिन्यांना आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले.

1993 पासून दाऊद आणि त्याच्या हस्तकांशी माझा लढा सुरू आहे. त्यांना ठार मारल्याशिवाय मी मरणार नाही, असेही राजन म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 26, 2014, 14:33


comments powered by Disqus